अमळनेर येथील संत सखाराम महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या दिवशी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘युवा प्रेरणा दिवस’ प्रताप कॉलेज तथा आयएमसी सदस्य प्रा बापू संदानाशिव यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून कु.देवयानी भावसार उपशिक्षिका ग.स.हायस्कूल तसेच पुजारी सुनील देव, सदस्य मनोज दुसाने, संत सखाराम महाराज ट्रस्ट अमळनेर उपस्थित होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना युवकांनी स्वामी विवेकानंदांचा आदर्श जीवनासमोर ठेवावा असे आवाहन कु.देवयानी भावसार मॅडम यांनी केले. अमळनेर मधील यशस्वी उद्योजक श्री.राहुल भिकन भोई यांनी यशस्वी उद्योजक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करावे,याचे मार्गदर्शन केले. यशस्वी उद्योजक श्री चेतन पाटील व श्री संजय पितांबर शिरसाट हेही कार्यक्रमाला उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्यावर भाषणे झालीत. तसेच तालुकास्तरीय तंत्र प्रदर्शनात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. अध्यक्षांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी आपल्या व्यवसायात कौशल्य प्राप्त करून स्वतःचा व्यवसाय सुरू करावा,देशाची सेवा करावी असे आवाहन केले संस्थेचे प्राचार्य,श्री.ए.बी.देव व संस्थेचे प्रभारी गटनिदेशक श्री व्ही.पी. वाणी सर वरिष्ठ शिल्पनिदेशक श्री ए डब्ल्यू दुसाने सर यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ.के. व्ही.बिराडे ,सौ एस.एस.इंगळे ,श्री के.जी. माळी,कु एन.आर.निकम, कु. जे जी दुबे,श्री डी एस पाटील, कु.व्ही.डी. मोरे श्री सचिन महाजन सर, कु.आर के मासरे,श्री नितीन महाले सर, श्री मनोज चव्हाण, श्री चेतन जावळेकर यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सागर पाटील सर,प्रास्ताविक कु.एन. आर. निकम व आभार कु.जे.जी दुबे यांनी मानले