अमळनेर प्रतिनिधी येथील मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड,संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेला सम्राट बळीराजा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे शहरातील सप्तशृंगी कॉलनी,शिव कॉलनी भागात सर्व बळीपुत्र एकत्र येऊन हा महोत्सवात सहभागी होत असतात. कपटाने मारणाऱ्या वामानाचा निषेध करीत महान बळीराजाचा सन्मान करत त्यांचा गजर करत असतात. आज “इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो” चा गजर करण्यासाठी सकाळी ९.३० वाजता बळीराजा यांच्या मिरवणुकीला सुरवात होणार असून शहरातील मुख्य रस्यावरून मिरवणूक जाणार आहे.मिरवणुकीचा समारोप तहसील कार्यालया जवळील बळीराजा स्मारक येथे होणार
आहे.
याप्रसंगी खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते
राजमाता जिजाऊ पूजन तर माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या हस्ते बळीराजा पूजन होणार आहे.यावेळी डॉ अनिल शिंदे,बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील,माजी जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.