अमळनेर येथे राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद विचार विनिमय बैठक संपन्न…

अमळनेर येथील संविधान प्रेमी नागरिकांची एरंडोल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद च्या नियोजना बाबत विचार विनिमय बैठक संपन्न.

सविस्तर वृत्त असे की, संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने एरंडोल येथे राज्य स्तरीय संविधान सन्मान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजना बाबत विचार विनिमय करण्यासाठी शहरातील प्रबुद्ध विहारात दि 22 रोजी सायंकाळी 5.30 वाजता सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

सभेला मार्गदर्शन करण्यासाठी संविधान सन्मान परिषदे चे आयोजक प्रा शिरसाठ यांनी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना सांगितले की,देशात दोन विभिन्न विचार धारा दिसते,एक समता मानणारे तर दुसरी विषमतेला खतपाणी घालणारे आहेत. विविध व्यक्तिमत्त्व समोर आणल्याने देशात संभ्रम,सध्या बौद्धांना एकटे पाडून संविधान नष्ट करणे सुरू,संविधान हे जगातील समतेचा दस्ताऐवज आहे,या समतेची ब्राम्हणांना धडकी भरली आहे, आपल्या देशाच्या आजू बाजूच्या देशात अशांतता आहे मात्र भारतात निव्वळ संविधना मुळे उद्रेक नाही, यामुळे संविधान जतन करण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची आहे. याकरिता नागरिकांना संविधाना प्रति आदर व जागृती निर्माण व्हावी म्हणून राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे आयोजन एरंडोल येथे आयोजित केले आहे. सदर परिषद यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा आर्थिक सहभाग महत्त्वाचा असेल. या परिषदेत राजकीय हस्तक्षेप राहणार नाही,असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मुख्याध्यापक धनराज मोतीराय,भंते अमर ज्योती आदींनी ही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या बैठकीत प्रा. भरतजी शिरसाट, विवेक सैंदाणे,प्रा.डॉ.विजय गाढे, गौतम मोरे, मिलिंद निकम, हृदयनाथ मोरे,अतुल डोळस, प्रा.अशोक पवार, बापूराव संदानशिव, राजेंद्र गायकवाड, ज्ञानेश्वर निकम, विश्वास निकम, सोपान भवरे,प्रा.डॉ. भगवान भालेराव, मंगलाताई सोनवणे, प्रमिलाताई ब्रह्मे, बापूराव ठाकरे, दयाराम पाटील, प्रा.डॉ. लीलाधर पाटील,सिद्धार्थ सोनवणे, रणजीत शिंदे, भागवत आण्णा,डी आर सैंदाने गुरुजी,बाळासाहेब सोनवणे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सूत्रसंचालनप्रा.डॉ.राहुल निकम,आभार प्रदर्शन आयु. मिलिंद निकम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!