अमळनेर येथील नगरपरिषद मार्फत आता प्लास्टिक वापर, विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. अमळनेर नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन अधिनियम व प्लास्टिक कचरा अधिनियम याद्वारे प्लास्टिक बंदी केलेली असून शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. शासनाने १ जुलै २०२२ पासून सिंगल यूज प्लास्टिक व वस्तूवर पूर्णपणे प्रतिबंध घातले होते. हे हेरून अमळनेर नगर परिषदेने शहरात प्लास्टिकला प्रतिबंध केले.
महारष्ट्र शासनाने व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने १ जुलै २०२२पासून भारत सरकारने अनेक राज्यात प्लास्टिक वापरण्यावर बंदी घातली. अमळनेर नगर परिषदेनेही शहरात प्लास्टिक बंदी केली होती. अमळनेर शहरात पुन्हा अनेक दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर करण्यात येत असून, प्लास्टिकची विक्रीही करण्यात येत आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर व विक्री करणाऱ्या दुकानदारांवर नगर परिषद प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
प्लास्टिक वापरताना किंवा विकताना सापडल्यास किंवा साठवणूक करतांना आढळल्यास *पहिली कारवाई ५ हजार रुपये, दुसरी कारवाई १० हजार, तर तिसरी कारवाई २५ हजार दंड व तीन महिने कारावास*
आपल्या परिसरात कोणी व्यावसायिक प्लास्टिक वापर विक्री व साठवणूक करताना आढळल्यास त्वरित त्याची माहिती स्वच्छता विभाग, नगरपरिषद अमळनेर कार्यालयास येथे कळविण्यात यावे, असा संदेश नागरिकांना पाठविला आहे. नगर परिषद अधिकारी श्री संतोष बिऱ्हाडे, स्वच्छता निरीक्षक 9960067316 तसेच श्री किरण खंडारे स्वच्छता निरीक्षक 9371199244* या क्रमांकावर संपर्क साधावा.
मुख्याधिकारी तुषार नेरकर-
सर्व नागरिक, व्यापारी वर्ग, शाळा, महाविद्यालय, संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालय इत्यादी सर्व आस्थापना यांनी मोठ्या प्रमाणात कापडी पिशवीचा वापर करावा तसेच आपल्या घरातील कचरा हा घंटागाडीतच द्यावा, कोणीही कचरा बाहेर उघड्यावर किंवा नाला, गटारी मध्ये न टाकता किंवा न जाळता तो घंटागाडीतच द्यावा. तसेच कचरा हा ‘ओला, सुका व घरगुती घातक’ असा वर्गीकरण करूनच द्यावा. नागरिकांनी कापडी पिशवीचा वापर करून पर्यावरणाचा समतोल राखावा व शहर स्वच्छ प्लास्टिक मुक्त करण्यास सहकार्य करावे व आपला परिसर स्वच्छ ठेवावा .