अमळनेर येथील मंगरूळ एमआयडीसीत प्लास्टिकच्या गोडाऊन मध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याने लाखो रुपयांचे झाले नुकसान.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील मंगरूळ येथे औद्योगिक क्षेत्रात दि २० रोजी रात्री सात वाजेच्या दरम्यान सैय्यद मुझफ्फर अली मोहम्मद अली यांच्या प्लास्टिक भंगार गोडाऊनला जवळच असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मर येथील विद्युत तार अचानक तुटल्याने आग लागली. प्लास्टिकने लगेच पेट घेतल्याने आगीचे प्रमाण वाढले.त्यात सुमारे सात ते आठ लाखाचे नुकसान झाले आहे. घटनेची खबर मिळताच न पाच्या अग्निशमन दलाचे बंब वेळीच गेल्याने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी ,फारुख शेख , जफर पठाण ,सत्येंन संदानशीव ,दिनेश बिऱ्हाडे , आकाश संदानशीव ,योगेश कंखरे ,आकाश बाविस्कर ,विकी भोई यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. तन्वीर अली याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अकस्मात आगीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.