जळगाव प्रतिनिधी येथील इच्छादेवी चौकात सदोबा वेअरहाऊस परिसरात अग्रवाल मॉलमध्ये झुडियो स्टोअरचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार श्री गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते आज दिनांक 3/10/2024 रोजी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याच्या खासदार श्रीमती स्मिता उदय वाघ होत्या.
झुडिओ स्टोअरही टाटा समूहाचे टाटा ट्रेन्स लिमिटेड या कंपनीचे स्टोअर आहे. सदरच्या स्टोअरची निर्मिती अमळनेर येथील उद्योगपती श्री बजरंगलाल बन्सीलाल अग्रवाल यांचे चिरंजीव श्री राधेश्याम बजरंगलाल अग्रवाल व त्यांचे पुतणे श्री नीरज दीपचंद अग्रवाल यांनी केली. स्टोअरमध्ये अल्प दरात म्हणजे सर्व कपडे रुपये 29/- पासून 999/- रुपये पर्यंत सुमारे 25000 स्टॉक आईटम मिळणार आहे. सदर स्टोअरची उद्घाटनाची प्रतीक्षा जळगावकर मागील एक महिन्यापासून करत होते. सदर स्टोअरच्या उद्घाटन प्रसंगी श्री लक्ष्मीकांत चौधरी, श्री मयूर चौधरी, श्री राजेश अग्रवाल, श्री अनुप अग्रवाल, श्री बाळासाहेब भदाणे, झुडीयो स्टोअरचे मॅनेजर आतिफ खान,सिटी मॅनेजर उमेश भगत, नीरज अग्रवाल व जुडीयो स्टोरचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.