अमळनेरात अमित शाह यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध

 

अमळनेर, गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत अपशब्द वापरून अपमान केला होता. या घटनेचा भारतभर तीव्र निषेध केला जात आहे. आज अमळनेर येथे देखील संविधान आणि आंबेडकरप्रेमींच्या वतीनं निषेध कारण्यात आला.


सविस्तर वृत्त,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा अमळनेरात तीव्र निषेध नोंदवण्यात आला. आंबेडकर.. आंबेडकर काय करता, त्यापेक्षा देव, देव, केल असत तर स्वर्गात जागा मिळाली असती असे वक्तव्य केले होते. आंदोलनवेळी गृहमंत्री अमित शाह यांच्या पुतळ्याचे दहन करत तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी महाराणा प्रताप चौक घोषणांनी दाणाणुन उठला होता.

या प्रसंगी समाधान मैराळे, कृष्णकांत शिरसाठ, ऍड. प्रशांत संदानशिव, मौलाना रियाज,प्रविण बैसाणे, विशाल सोनवणे, आत्माराम अहिरे, सुभाष आगळे, महेश पाटील, भिका धनगर, प्रकाश बिऱ्हाडे, नूर खान, अजय बिऱ्हाडे, भुपेंद्र शिरसाठ, राज मालचे, आदित्य शिरसाठ, विवेक शिरसाठ, विक्की सपकाळे, विशाल भिल, हर्षल सुतार, प्रेम मोरे, सागर भिल, दादू भिल, राहुल सोनवणे, कल्पेश बैसाने, दीपक पाटील, गोलू धनगर, पंकज शिरसाठ, दानेश पठाण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!