अमळनेर प्रतिनिधी, मुस्लिम, ख्रिश्चन, मराठा, धनगर आरक्षण आणि मूलभूत हक्कांचे संरक्षण या मागण्यांसाठी ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्राचे आज होणार अमळनेरात जंगी स्वागत.
सविस्तर वृत्त असे की,खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळावा या मागणीसाठी सामाजिक न्याय पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर ची यात्रा कोंडवा ते दिल्ली पर्यंत विविध राज्यातून जाणार आहे.
सामाजिक न्याय यात्रेची सुरुवात १ सप्टेंबर रोजी झाली आहे .पदयात्रेचा प्रारंभ किल्ले शिवनेरी, संगमनेर, कोपरगाव, येवला, अमळनेर, चोपडा, फैजपूर मार्गे दिल्ली असा पदयात्रेच्या मार्ग आहे. 2 ऑक्टोबर, गांधी जयंती दिनी राजघाट (नवी दिल्ली) येथे एक दिवस लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. तर 3 तारखेला जंतर मंतर येथे आंदोलन करण्यात येणार आहे.
याचाच एक भाग म्हणजे आज सदरच्या यात्रेचे शहरात सेंट मेरी इंग्लिश स्कूल येथे प्रथम स्वागत करून पुढे ही यात्रा शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज नाट्य गृह येथील महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सभेचे आयोजन करण्यात आले आहे.अमळनेर येथे सदर यात्रेचे आगमन होणार असल्याने त्याच्या स्वागताची जय्यत तयारी केली असल्याचे मोलाना रियाज यांनी सांगितले.
अमळनेर येथे सामाजिक न्याय यात्रेच्या स्वागतासाठी सर्व समाज बांधवांची अल्लामा फजले हक खैरबादी ( रहे,)स्टडी सेंटर आणि पब्लिक लायब्ररीत बैठक आयोजित करण्यात आली होती .यात्रेचे संयोजक असलम बागवान यांचे विचार ऐकण्यासाठी सायंकाळी ७.०० वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी लोकशाही प्रेमी लोकांनी स्वागता साठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वागत समितीचे प्रा.अशोक पवार, रियाज़ भाई मौलाना, बन्सीलाल भागवत आण्णा, प्रा.डॉ. राहुल निकम, प्रा.पी.एस.सोनवने, अर्जुन संदानशिव,अब्दुल गफ्फार खाटीक,अँड रज्जाक शेख,फारुख खाटीक सर,युसुफ पेंटर, ताहिर शेख सर. सोपान भवरे, अजय भामरे, दयाराम पाटील, संजय पाटील, बापूराव पाटील आदीनीं केले आहे.