अमळनेर प्रतिनिधी,येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलीत श्री मंगळ देव ग्रह मंदिरात मंगळ जन्मोत्सवानिमित्त १३ रोजी मंत्रघोषात विधिवत रित्या पूजा करुन साजरा करण्यात आला. पहाटे ५ वाजेला होणाऱ्या विशेष पंचामृत अभिषेकाचे मानकरी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद होते . सुशोभित पाळण्यात प्रतिकात्मक स्वरूपात बाल श्री मंगळ देवाला विराजमान करुन जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
या वेळी देवाला ५६ भोग दाखवण्यात आला. ५६ भोगाचे मानकरी छत्रपती संभाजीनगर येथील उपाध्याय कॅटरर्सचे उपाध्याय बंधू होते.दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे श्री मंगळ जन्मोत्सवाला मंदिरावर नवे ध्वज लावण्यात आले. ध्वजांचे मानकरी योगेश पांडव यांनी सवाद्य नवे ध्वज मंदिरात आणले.
मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ.डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, व्ही. व्ही. कुलकर्णी यांनी स्वागत केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ध्वजांचे व ध्वजाचे मानकरी असलेल्या पांडव दाम्पत्याचे औक्षण केले. ध्वज पूजनानंतर ध्वजांना विधिवत रित्या कळसावर व मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आले. मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी ध्वजवंदन केले. दरम्यान, दुपारी १ ते सायंकाळी ६ या वेळेत महाभोमयागाचे डॉ. आश्विन सोनवणे मानकरी होते. सायंकाळी ६ वाजता महाआरती झाली. दिवसभर भाविकांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला. वेंकीज या आंतरराष्ट्रीय ख्यातीची कंपनीने गावरान तुपातील मोतीचूर लाडू प्रसाद म्हणून भाविकांना वितरीत करण्यात आले. केशव पुराणिक, प्रसाद भंडारी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, विनोद पाठक, नितीन जोशी, मंदार कुलकर्णी, शुभम वैष्णव, गोपाल पाठक, चेतन नाईक, प्रविण भंडारी यांनी पौरोहित्य केले.
सोहळा यशस्वीतेसाठी मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, पुषंद ढाके, ए. डी. भदाणे, एम. जी. पाटील, जी. एस. चौधरी, आशिष चौधरी यांनी सहकार्य केले.