अमळनेर प्रतिनिधी,येथील लाडक्या बाप्पा चे आगमना पासून विसर्जन उत्सव शांततेत व आनंदात पार पाडण्यासाठी स्थानिक प्रशासनाने केली जय्यत तयारी.
शहरासह तालुक्यात आपल्या लाडक्या श्री गणेशाचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र आनंदी वातावरण आहे.आपल्या घरी अथवा परिसरात बाप्पाला आणण्यासाठी प्रत्येक जन भावूक झाला आहे. गणेश मंडळ यांनी जय्यत तयारी केली आहे.भक्तांचा आनंद द्विगुणित व्हावा व भयमुक्त वातावरणात बाप्पाचे दर्शन घेता यावे म्हणून पोलिस प्रशासनाने दक्षता म्हणून जवळ पास सहा शांतता समितीच्या बैठका घेतल्या,मौलाना- मौलवी,गणेश मंडळ,प्रत्येक धर्मातील प्रतिष्ठीत व्यक्तींशी प्रत्यक्ष बैठका,समाजातील जवळ पास ११२ विघ्नसंतोषी व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्या,मोहल्ला कमिटी सोबत सामाजिक सलोखा निर्माण कामी चर्चा करून येणारे सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
तालुक्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तीन अधिकारी, पन्नास पोलिस कर्मचारी, दंगा विरोधी पथक,राज्य राखीव पोलिस दलाचे एक प्लाटुन, जवळपास पिन्नास च्या आसपास पुरुष महिला होमगार्ड सह स्वयं सेवक सज्ज झाले आहे.नुकतेच शहरातील गांधलिपुरा भागात दंगल विरोधी सराव करण्यात आले आहे.
पोलिस निरीक्षक विकास देवरे यांचे नागरिकांना आवाहन
– नागरिकांनी सोशियल मीडिया वरील अफवांवर विश्वास ठेवू नये,परिसरातील महिलांचे संरक्षण करावे,सामाजिक सलोखा निर्माण व्हावा या उद्देशाने प्रत्येकाने एकमेकांच्या धर्मातील सण उत्सवास आपले मानून सहभाग घेऊन आपल्या अमळनेर नगरीचे नाव उंचवावे.वितुष्ट निर्माण करणाऱ्याची गय केली जाणार नाही.
सर्व गणेश भक्तांना करडी नजर न्युज कडून हार्दिक शुभेच्छा!!!