अमळनेर प्रतिनिधी, तालुक्यातील चौबारी गावातील काही घरांची सततच्या पावसामुळे पडझड होत आहे.
सविस्तर तालुक्यात या वर्षी फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे.रिपरीपत्या पावसाने शेतीपिकांचे ही नुकसान झाले आहे.शेतकऱ्याला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असतानाच सतत पडत असलेल्या पावसामुळे चौबारी गावातील काही घरांची पडझड सुरु झाली आहे.
गेल्या दोन महिन्यापासून रोज पाऊस पडत असल्यामुळे गावांमधील बरेच घरांची अवस्था नाजूक झाली आहे.सदर ग्रामस्थांना गावात इतरत्र राहायला सुद्धा दुसरे घर मिळत नाही.त्यामुळे चौबारी गावातील रहिवाशांचे खूप हाल होत आहे. शासनाने त्वरित पहाणी करून पंचनामा करून रहिवाशांना मदतीचा हात द्यावा ही ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.त्वरित मदत नमिळाल्यास आंदोलन केले जाईल,असा इशारा ऊबाठा शिवसेनेचे विजय पाटील यांनी करडी नजर न्युज शी बोलताना दिला आहे.