अमळनेर शहर प्रतिनिधी,जळगांव जिल्हयात कापुस उत्पादक तालुक्यात अमळनेर अग्रण्य तालुका असताना अमळनेर येथे CCI कापुस खरेदी केंद्र चालू केले नाही, हा अमळनेर तालुक्यातील शेतकर्यांवर मोठा अन्याय आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बाजारात कापसाचे भाव CCI भावापेक्षा ५००ते १००० रुपयांनी कमी आहेत. जिल्ह्यात ११ केंद्र चालू आहेत पण अमळनेरला कैंद्र चालू केले नाही.तरी अमळनेर तालुक्यातही कापूस खरेदी कैंद्र सुरु करून येथील शेतकऱ्यांना न्याय द्यावा,अश्या आशयाचे मागणी चे निवेदन राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीने अमळनेर प्रांताधिकारी यांना दिले आहे.
याप्रसंगी जिल्हा कार्यध्यक्ष प्रा सुभाष पाटील, सुरेश पाटील,दिनेश पाटील,दिनेश पवार,त्र्यंबक पाटील,विठ्ठल पवार,प्रल्हाद पाटील,भानुदास पाटील,अशोक पाटील,शिवाजी पाटील,शरद पाटील,रविंद्र पाटील,रामकृष्ण पाटील आदी उपस्थित होते.