चालू वर्षात अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मिळतेय डीबीटी प्रणालीद्वारे मदत
जळगाव जिल्ह्यात 91 कोटीचा निधी,अमळनेर मतदारसंघातही मोठी मदत-मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
अमळनेर प्रतिनिधी,जानेवारी ते मे 2024 या चालू वर्षात अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे आर्थिक मदत मिळणे सुरू झाले असुन यासाठी जळगाव जिल्ह्यात 91 कोटीचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
अमळनेर मतदारसंघातील अमळनेर व पारोळा तालुक्यात सर्वाधिक मोठे नुकसान झाले असल्याने येथील शेतकरी बांधवाना जिल्ह्यात सर्वाधिक 25 कोटींच्या आसपास मदत मिळणे सुरू झाले आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर ही मदत दिली जात असून जळगाव जिल्ह्यात 15 तालुक्यांना मदत मिळणे सुरू झाले आहे.जळगाव जिल्ह्यात 32 हजार 355.3 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 55 हजार 716 शेतकरी बांधवाना एकूण 91 कोटी 38 लक्ष,47 हजार 134 एवढी मदत दिली जात आहे.पैसे थेट खात्यावर पडू लागल्याने जिल्ह्यातील शेतकरी बांधवामध्ये समाधान व्यक्त होत आहे.सदर मदतीबद्दल शेतकरी बांधवानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.
जिल्ह्यात तालुकानिहाय मिळणारी मदत पुढीलप्रमाणे,,,
जळगाव तालुका शेतकरी संख्या 113, बाधित क्षेत्र 42.50 (हे.आर), निधी 1268920, जामनेर तालुका शेतकरी संख्या 3434, बाधित क्षेत्र 1797.47 (हे.आर), निधी 52138180, भुसावळ तालुका शेतकरी संख्या 170, बाधित क्षेत्र 34.46 (हे.आर), निधी 1199800, बोदवड तालुका शेतकरी संख्या 3532, बाधित क्षेत्र 3556.47 (हे.आर), निधी 98007280, मुक्ताईनगर तालुका शेतकरी संख्या 7033, बाधित क्षेत्र 4476.99 (हे.आर), निधी 141171620, एरंडोल तालुका शेतकरी संख्या 45, बाधित क्षेत्र 29.24 (हे.आर), निधी 397664, धरणगाव तालुका शेतकरी संख्या 297, बाधित क्षेत्र 113.29 (हे.आर), निधी 3075480, पारोळा तालुका शेतकरी संख्या 8321, बाधित क्षेत्र 5117.58 (हे.आर), निधी 137084200, यावल तालुका शेतकरी संख्या 1192, बाधित क्षेत्र 490.86 (हे.आर), निधी 15552220, रावेर तालुका शेतकरी संख्या 1950, बाधित क्षेत्र 1148.34 (हे.आर), निधी 41340240, अमळनेर तालुका शेतकरी संख्या 8881, बाधित क्षेत्र 4411.59 (हे.आर), निधी 120136920, चोपडा तालुका शेतकरी संख्या 9001, बाधित क्षेत्र 5634.40 (हे.आर), निधी 153248400, पाचोरा तालुका शेतकरी संख्या 2415, बाधित क्षेत्र 685.02 (हे.आर), निधी 18524250, भडगांव तालुका शेतकरी संख्या 1776, बाधित क्षेत्र 790.14 (हे.आर), निधी 21452760, चाळीसगाव तालुका शेतकरी संख्या 7556, बाधित क्षेत्र 4026.95 (हे.आर), निधी 109249200.