अमळनेर – पारोळा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे ओला दुष्काळ जाहीर करून कर्ज माफीसह तातडीने आर्थिक मदत करा – माजी आमदार साहेबराव पाटील

अमळनेर प्रतिनिधी, येथील माजी आमदार साहेबराव पाटील यांनी तालुक्यातील यंदाच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेला घास काढून घेतल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट असल्याने शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत करावी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री,पालकमंत्री सह मदत व पुनर्वसन मंत्री यांना पत्र देऊन मागणी केली आहे.

सविस्तर वृत्त असे की,यंदा फार मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने अमळनेर सह पारोळा तालुक्यातील शेतकरी हवाल दिलं झाले आहे ,त्यांना शासस्तरावरून मदत व्हावी म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील यांनी मुख्यमत्र्यांकडे पत्र पाठवले आहे.त्यात त्यांनी खरीप हंगाम – जून ते सप्टेंबर २४ आणि १३ ऑक्टोंबर २०२४ अखेर अमळनेर तालुक्यात ९८४.२६ मि.ली. आणि पारोळा तालुक्यातील ७५७.०० मि. ली. म्हणजेच सरासरीपेक्षा अधिक सततचा पाऊस, विजेचा कड़कड़ाटसह वादळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कापसा सह सर्व पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामुळे खरीप हंगाम २०२४ हातातुन गेल्यामुळे शेतकरी पुन्हा हताश होवून दुहेरी संकटात सापडला आहे, त्यामुळे शेतकर्यांची शासनाप्रती असंतोषाची व नाराजीची भावना दूर करण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून कर्ज माफीसह तातडीने आर्थिक मदत करण्याच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करावी,या आशयाचे पत्र माजी आमदार साहेबराव पाटील यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!