अमळनेर प्रतिनिधी, येथील दसरा मैदानावर मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते श्रीराम व लक्ष्मण यांचे पूजन व सत्कार करण्यात आले.याप्रसंगी मंत्री अनिल पाटील यांनी उपस्थित सर्वाना शुभेच्छा दिल्या.यानंतर भव्य आतिषबाजी करण्यात आली.त्यानंतर श्रीरामांच्या हस्ते रॉकेट रुपी अग्निबाण सोडून रावणाच्या भव्य प्रतिमे्चे दहन करण्यात
आले.रावण दहन होताच जय श्रीराम यांचा प्रचंड जयघोष होऊन उपस्थित सारे सोने लुटण्यासाठी मार्गस्थ झाले. सूत्रसंचालन दिनेश शेलकर यांनी केले. यशस्वितेसाठी विनोद लांबोळे यासह मित्र पवन पुत्र व्यायाम शाळेच्या मित्र परिवाराने परिश्रम घेतले.
याप्रसंगी माजी आमदार साहेबराव पाटील,पोलिस निरीक्षक विकास देवरे, नर्मदा फाऊंडेशन चे संचालक डॉ अनिल शिंदे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील,अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, फोटोग्राफर संघटनेचे महेंद्र पाटील सह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.