अमळनेर: धनदाई एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब डी. डी. पाटील यांची राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खासदार डॉ.जी. संजीवा रेड्डी साहेब यांनी त्यांना मान्यतेचे नियुक्ती पत्र देऊन ही निवड केली आहे.
या निवडीबद्दल त्यांचे संस्थेचे उपाध्यक्ष तथा प्राचार्य के डी बापू पाटील सर व सर्व संचालक यांनी अभिंदन केले आहे तसेच शैक्षणिक ,सामाजिक ,राजकीय क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.