अमळनेर प्रतिनिधी, पतोंडा रहिवासी सेवानिवृत्त शिक्षकाने सावखेडा येथील तापी नदीत उडी मारत आत्महत्या केली.
सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील पातोंडा गावाचे रहिवासी राजेंद्र रामदास लोहारे हे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक होते. यांनी दि. १० रोजी दुपारी पातोंडा पासून जवळच असलेल्या सावखेडा तापी नदी वरून उडी मारत आत्महत्या केल्याचे त्यांचे भाऊ प्रदीप लोहारे यांना सायंकाळी कळताच त्यांनी नदीकाठी शोधाशोध केली. शुक्रवारी सकाळी मुंगसे – दापोरी गावाच्या नदीकाठी मृतदेह आढळला आल्याचे समजले. अमळनेर पोलिस स्टेशनला नोंद होऊन, शविच्छेदनानंतर पातोंडा येथे अंत्यविधी करण्यात आले.
सदर आत्महत्या त्यांनी दीर्घ आजाराच्या नैराश्यपोटी केल्याचे त्यांचे भाऊ प्रदीप लोहारे यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन भाऊ, बहिण, असा परिवार आहे.ते माध्यमिक शिक्षक प्रदीप लोहारे यांचे मोठे बंधू तर अमळनेर एलआयसी ऑफिसर मयूर लोहारे यांचे वडील होत.