तीन भावांच्या अनुपस्थित बहिणींनी दिली दादाच्या हाकेला साद….मंत्री अनिल पाटील बहिणींना बहुसंख्येने बोलवण्यात यशस्वी..

अमळनेर प्रतिनिधी, येथील तालुकास्तरीय लाडकी बहिण मेळावा राज्यातील तीन भाऊ अर्थात मुख्यमंत्री व दोन उपुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार होता. मात्र काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही .याउलट मंत्री अनिल पाटील यांच्या हाकेला साद देत लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांनी उपस्थित बहिणींना संबोधित करताना बोलले की,महायुती सरकारच्या काळात अमळनेर विधानसभेच्या विकासाचा एक नवा अध्याय लिहला गेला असून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या काळात मला तुमची साथ हवी आहे.लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी महायुती सरकार सदैव त्यांच्या पाठीशी असून या भूमीसाठी मी एकटा काहीच करू शकत नसल्याने सामूहिक जबाबदारी घ्या आणि आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य उज्वल करा, असे प्रतिपादन केले

तर बहिणींनो ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या पाठीशी राहून मला भरभरून मतांनी खासदार केले त्याच पद्धतीने आपल्याला सर्वांना महायुतीचे उमेदवार अनिल दादाच्याच पाठीशी राहायचे असून त्यांची झोळी रिकामी राहू देऊ नका,धरण पूर्ण करायचे असेल तर राज्यात महायुतीचे च सरकार हवे असे आवाहन खासदार स्मिता वाघ यांनी केले.मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थींचा सन्मान सोहळा तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत महिला बचत गट सदस्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन अमलनेरात करण्यात आले होते.प्रताप महाविद्यालयात अतिशय भव्य शामियानात आयोजित या मेळाव्याला महिलांची हजारोंच्या संख्येने रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती.याठिकाणी उत्तम बैठक व्यवस्था व नियोजन करण्यात आले होते.दुपारी सव्वा दोन वाजता मेळाव्याला सुरुवात झाली.यावेळी पावसाने प्रचंड जोरात हजेरी लावून देखील मेळावा यशस्वी झाला.

व्यासपीठावर खासदार स्मिता वाघ, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ना.पाटील पुढे म्हणाले की, शासनाच्या विविध योजना आज तळागाळापर्यंत पोहचत आहेत.अमळनेर तालुक्याला लागलेला दुष्काळी तालुका हा डाग येणाऱ्या काळात पुसून टाकायचा असून तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीपर्यंत पाणी नेण्याचं उद्दिष्ट आहे.पाडळसरे प्रकल्पाबाबतीत राज्य आणि केंद्र सरकार सकारात्मक असून सर्वच प्रशासकीय मान्यता प्रकल्पाला मिळाल्या असून लवकरच केंद्राच्या यादीत त्याचा समावेश होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.तसेच अजित दादा पक्के आपल्या पाठीशी आहेत.सुरवातीला एवढा मोठा मंडप भरेल का अशी चिंता असताना आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वांनी उपस्थिती देऊन मोठे प्रेम दिले आहे,असेच प्रेम भविष्यात अपेक्षित असून येणारा काळ आपल्याला सुजलाम सुफलाम करायचा आहे.आपल्याला घरात दररोज व शेतात थेट पाणी हवे असेल,सर्वत्र बंधारे हवे असतील,ठिकठिकाणी रस्ते पाहिजे असतील डब्या चगविनार्यांच्या नादी न लागता आमचे हात मजबूत करा.असे आवाहन त्यांनी केले.आणि आतापर्यंत महिलांना अर्थसहाय्याची कोणतीच योजना बंद पडली नसल्याने लाडकी बहीण योजना कधीच पडणार नाही असा विश्वास त्यांनी महिलांना दिला.

दरम्यान सदर मंचावर सर्व समाजाच्या महिला प्रतिनिधींना स्थान देण्यात आले होते तर उपस्थित सर्व महिलांचे सौ जयश्री पाटील यांनी हळदी कुंकू देऊन औक्षण केले.

सूत्रसंचालन शरद सोनवणे व डिगंबर महाले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!