अमळनेर प्रतिनिधी, येथील शहरातील हम रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या कळपां मुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताचे प्रमाण वाढल्याने न पा प्रशासनाच्या वतीने योग्य काळजी घ्यावी.
शहरातील रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघात ही वाढली असून वाहन चालकांचे जीव धोक्यात आले आहेत. मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम नगरपालिकेकडून सातत्याने राबवली जात नसल्याने या जनावरांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यांवरील या जनावरांमुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त झाला आहे.
मागील अनेक दिवसांपासून पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढत असताना त्यांच्या बंदोबस्त करण्याकडे नपा प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.शहरातील वेगवेगळ्या भागांमधील रस्त्यांवर तर जणू काही ठिकाणी जनावरांचे साम्राज्य असल्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
अमळनेर शहर हे धार्मिक हब असल्याने येथे दररोज अनेक भाविक येत असतात.तसेच हे शहर व्यापारी दृष्टीने ही महत्व पूर्ण मध्यवर्ती ठिकाण आहे.खानदेशातील शिक्षणाचे माहेर घर सुध्दा आहे.यामुळे रोज येणारे भाविक,व्यापारी,विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक ही पूर्ते त्रस्त झाले आहे.काही दिवसा पूर्वी दोन जनावरांमध्ये झुंज झाल्याने दुचाकी स्वरानां आपले जीव मुठीत घेऊन पळावे लागले.विशेष बाब म्हणजे पत्रकार समाधान मैराले यांच्या दुचाकीला एका जनावराने धक्का दिल्याने त्यांच्या हाता पायाला जबर मार लागला आहे.त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकां सोबतच वृध्द,महिला,बालक,विद्यार्थी यांच्या मध्ये दहशत निर्माण झाली आहे.रात्रीच्या वेळेस सदर जनावरे शहरातील दुकानांच्या शेडचा आसरा घेत असल्याने त्याठिकाणी रोज मलमूत्र पडलेले असते.याने व्यापारी वर्ग ही हैराण झाला आहे.एकंदरीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.
जनावरांच्या मालकांवर गुन्हा दाखल करावा…
मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव पाहता नगरपालिकेने राज्याचे कायदे पशू क्रूरता नियम व अधिनियम १९६०, मुंबई पोलीस कायदा १९५१ अतंर्गत जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करावे व मोकाट जनावरे गोशाळेत रवानगी करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत.
आरोग्य विभागाचे दुर्लक्ष….या मोकाट जनावरांमुळे शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असताना नगरपालिकेचा आरोग्य विभाग या कडे काना डोळा करीत असल्याचे दिसून येत आहे.
मुख्याधिकारी नेरकर यांना फोनद्वारे माहिती दिली असता त्यांनी सांगितले की,नगर पालिका कडे मोकाट जनावरांसाठी कोंडवळा नाही.जनावरांच्या मालकांना याबाबत सूचना देऊ.