अमळनेर प्रतिनिधी येथील सराफ बाजार मधील देशमुखवाडी मधील चोरडिया नामक व्यक्तीचे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेली मुख्याधिकारी सह कर्मचारी यांना सदर कामी अडथळा आणल्याने सात जणांवर गुन्हा दाखल.
अमळनेर शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण केलेले बघायला मिळत आहे.शहराच्या हम रस्त्यावर असो की कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत असताना मात्र नगरपालिका प्रशासन मात्र या कडे का दुर्लक्ष करीत आहे.काही ठिकाणी तर राजकीय पुढाऱ्यानीं स्वतःच अतिक्रमण केलेले बघायला मिळते.शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या पादचारी सुध्दा अतिक्रमित केलेल्या असल्याचे अनेक वृत्तपत्रांनी बातमी द्वारे वांरवार न पा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.यावर अद्याप कोणतीच कारवाई करतानां दिसत नाही.हीच काहीशी परिस्थिती कॉलनी परिसरात बघायला मिळत आहे.अनेकांनी घरासमोरच्या कॉलनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.काहींनी तर गटारी बुजवून बांधकाम केल्याने पावसाळ्यात कॉलनी परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असून नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे.यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.याबाबी कडे नपा प्रशासनाने अधिकचे लक्ष देऊन कडक कारवाई करावी.
अश्याच प्रकारचे अतिक्रमण शहरातील सराफ बाजार देशमुखवाडा मधील नागराज चोरडिया यांनी अतिक्रमण केले असल्याने न पा प्रशासनाच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून त्यांना अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या होत्या.मात्र या कडे नागराज चोरडिया दुर्लक्ष करून शहरातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील ही अतिक्रमण काढून टाका मगच आम्हीं आमचे अतिक्रमण काढू,असे सांगून सदर अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या मुख्याधिकारी नेरकर व अतिक्रमण पथका समोर नागराज चोरडिया यांच्या आईनीं स्वतः सह आपल्या दोन सूनानवर डिझेल टाकून मरून जाऊ व मृत्यूस कारणीभूत तुमचे नाव सांगू, अशी धमकी दिल्याने मुख्याधिकारी नेरकर व अतिक्रमण पथकाला अतिक्रमण तोडण्यास अडथळा निर्माण करून शिवीगाळ केल्याने त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.विशेष बाब म्हणजे घटना स्थळी पोलिस प्रशासन सुध्दा उपस्थित होते.
नगरपालिकेने निष्पक्षपणे शहरातील अतिक्रमण काढून शहराला अतिक्रमण मुक्त करावे,हीच सुज्ञ नागरिक मागणी करीत आहे.