अमळनेर येथील काँग्रेस व महाविकास आघाडीने आज नगर परिषदेला पाणीपट्टी वरील दोन टक्के व्याज दर रद्द करावा म्हणून एक महत्त्वाची मागणी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की,नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांकडून दर महिन्यात शेकडा दोन टक्के व्याज आकारण्याचा निर्णय तात्काळ मागे घेतला जावा, अशी चिंता माननीय डॉक्टर अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक मुन्ना भाऊ शर्मा यांनी व्यक्त केली.सदर बैठकीत किसान काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख एडवोकेट रज्जाक शेख, आणि जिल्हा उपाध्यक्ष संदीपजी घोरपडे यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती.युवक काँग्रेस अध्यक्ष तेली, माजी युवक काँग्रेस अध्यक्ष मोठा भाऊ मनोहर पाटील, किसान राष्ट्रवादीचे अध्यक्ष लांडगे, माजी नगरसेवक गणेश गुप्ता, माजी नगरपरिषद कर निरीक्षक श्री सुखदेव होलार, आणि ऑडिटिंगचे छोटू वैद्य यांसारख्या अनेक नेत्यांनीही आवाज उठविला.
या मागणीला स्थानिक नागरिकांचाही मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळत असल्याने काँग्रेस ने मुख्याधिकारी नेरकर यांना व्याजदर रद्द करण्यात यावे म्हणून निवेदन देण्यात आले.