सरकारी आयटीआयला संत श्री सखाराम महाराजांचे नाव देण्याचे मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय -मंत्री अनिल पाटील 

अमळनेर प्रतिनीधी,येथील शहरातील पिंपळे रस्त्यावर असलेल्या सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस संत श्री सखाराम महाराजांचे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली.

संत सखाराम महाराज हे अमळनेर प्रती पंढरपूर विठ्ल रुखमाई वाडी संस्थान चे आद्य पुरुष असून संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा झेंडा हातात घेऊन फिरणारे ते एकमेव संत आहेत.महाराजांचे अमळनेर हे मुख्य स्थान असले तरी पंढरपूर पासून महाराष्ट्रभर महाराजांचे प्रस्थ असल्याने सर्वत्र त्यांचा भक्त परिवार मोठ्या प्रमाणात आहे.अमळनेर करांची विशेष श्रद्धा सखाराम महाराज यांच्यावर असल्याने अमळनेर येथील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस संत सखाराम महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मंत्री अनिल पाटील यांनी मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती.सदर मागणी आणि महाराजांवरील भक्तांची श्रद्धा लक्षात घेता काल शुक्रवार दिनांक 4 रोजी मुंबई येथे झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

मंत्रिमंडळाने सदर निर्णय घेऊन भाविक भक्तांच्या भावना जोपासल्याने मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस,ना अजित पवार,ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन,पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचेसह मंत्री मंडळाचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!