अमळनेर प्रतिनीधी येथील,सेंट मेरी इंग्लिश मिडीयम स्कूल ने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पटकावले प्रथम क्रमांकाचे बक्षीस.
सविस्तर वृत्त असे की,जळगांव येथे नुकतेच जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.स्पर्धा मध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतलेला होता.
त्यामध्ये अमळनेर तालुक्यातील सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूल,मंगरूळच्या 17 वर्षा वयोगटाच्या आतील मुलींच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला.यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
या पथकात जान्हवी भामरे,श्रेयसी सोये, यज्ञा पाटील,मेघना मराठे, मानसी पाटील, प्रांजली सोनवणे,नेहा वाल्हे, निकिता काकुलीत, जानवी पाटील,अपूर्वा पाटील, अनन्या पाटील, वैष्णवी पाटील आदी विजयी खेळाडूंची नावे आहेत. या सर्व खेळाडूचे शाळेच्या मुख्याध्यापीका सिस्टर जॉईस, मदर डिव्हाईन यांनी गुलाब पुष्प देऊन सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व त्यांना क्रीडा शिक्षक कमलेश मोरे,किरण शिंपी व प्रशिक्षक विक्की बैसाणे यांचे मार्गदर्शन लाभले.