शिंदखेडा प्रतिनीधी ,येथील वर्धमान कोटेक्स व पुष्पक ऍग्रो इंडस्ट्रीज चे संचालक गिरीश रमेश टाटिया यांना कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने बेस्ट जिनर्स अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
गिरीश टाटिया यांनी सन 2018 मध्ये शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक व्यवसाय सुरू करून कापूस प्रक्रिया उद्योग येथील रेल्वे स्टेशन जवळ वर्धमान कोटेक्स या नावाने जिनिंग ची स्थापना केली, 2019 मध्ये सीसीआय भारतीय कापूस निगमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला दर उपलब्ध करून दिलाहोता.
उत्तरोत्तर त्यांच्या या जिनिंग ची प्रगती होत गेली. कॉन्फरन्स मध्ये त्यांना हा अवार्ड सी सी आय चे सीएमडी एल के गुप्ता, ऑल इंडिया कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट अतुल गणतराजी, महाराष्ट्र कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष भूपेंद्र राजपूत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यांनी हा अवार्ड खलाणे गावचे ग्रामपंचायत सदस्य, व दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोशन रमेश टाटिया यांच्यासोबत संभाजीनगर येथे जाऊन स्वीकारला. त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.