अमळनेर प्रतिनीधी,येथील खरीप हंगाम २०२३ मध्ये कापूस व सोयाबीनला मिळालेल्या कमी बाजारभावामुळे शासनाने घोषित केलेल्या कापूस व सोयाबीन अनुदानापासून हजारो शेतकरी अजूनही वंचित आहेत,यांना त्वरित अनुदान द्यावे म्हणून राष्ट्रीय किसान काँग्रेस कडून देण्यात आले निवेदन.
या शेतकऱ्यानी ऑनलाईन इ-पिकपेरा करण्याचा प्रयत्न केला होता पण तांत्रीक अडचणी मुळे त्याची नोंद त्यांच्या उताऱ्या वर झाली नाही.तरी त्या शेतकर्यांच्या उताऱ्या वर ती नोंद झाली कि नाही व नझालेली असल्यास ती करण्याची जबाबदारी तलाठीची होती. हजारो शेतकरी या चुकीमुळे याअनुदानापासून वंचित झाले आहेत.कारण उतारा वर जरी नोंद नसली तरी या शेतकयांनी पिकाची लागवड तर केलेली होती. या शेतकर्यांना २ ०२३ च्या खरीप हंगामाचा पीक विमा दैखील मिळालेला आहे. असे असल्याने त्यांच्या हक्काचे अनुदान तलाठी मार्फत भरपाई करून द्यावे. आधीच शासनाच्या चुकीच्या धोरण व अनेक नैसर्गिक संकटामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्या वर अजून अन्याय होणार नाही याची आपण काळजी घ्यावी.जर या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर आम्हाला कोर्टात जनहित याचिका दाखल करण्याशिवाय पर्याय राहणार नाही याची दखल घ्यावी,अश्या आशयाचे निवेदन अमळनेर प्रांतधीकरी यांना राष्ट्रीय किसान काँग्रेस च्या वतीने देण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रीय किसान काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रा सुभाष पाटील,बापुराव महाजन,विनायक सोनवणे,विनोद पाटील,सचिन पाटील कैलास पाटील,शैलेश पाटील,योगेश पाटील ,महेश पाटील आदी उपस्थित होते.