अंतूर्ली-रंजाने विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक पी डी पाटील प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्त

अमळनेर प्रतिनीधी येथील नवीन माध्यमिक विद्यालय अंतूर्ली-रंजाने विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय नानासाॊ.श्री पी डी पाटील सर त्यांच्या अनमोल अश्या प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. ह्या प्रसंगी विद्यालयात सरांचा सपत्नीक सेवापूर्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा. ताईसाॊ.तिलोत्तमा ताई पाटील सोबतच संस्थेचे सचिव श्री रविंद्र पाटील व संस्थेच्या संचालिका करिश्मा पाटील उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे पद अमळनेर पंचायत समिती अमळनेर, शिक्षण विस्तार अधिकारी कविता सुर्वे मॅडम यांनी भुषविले.सोबतच आमच्या अंतूर्ली केंद्राचे केंद्रप्रमुख श्री किरण शिसोदे सर, अंतूर्ली-रंजाणे केंद्र शाळेचे मुख्या.श्री भिकन पाटील सर विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. सरांच्या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी माननीय ताईसाॊ.कविता सुर्वे मॅडम यांनी आपल्या बहुमूल्य मनोगतात श्री पी डी पाटील सर यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता पूर्ण दर्जेदार शिक्षण व उच्च शिक्षणात करियर निवडताना व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व मॅडमांनी पटवून दिले.सेवापूर्ती समारंभाला अंतूर्ली पो.पाटील श्री सुभाष पाटील,श्री भटू पाटील,श्री संजय पाटील,श्री पंतिगराव पाटील,

श्री एन एम पाटील सर,श्री नाना पाटील तसेच तासखेडा येथील सामाजिक कार्यकर्त श्री बापूसाहेब पाटील,आमोदे येथील श्री देवराम पाटील यांची उपस्थिती प्रार्थनीय होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अजय पाटील सरांनी केले, सोहळ्याचा समारोप व आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय आर बी पाटील सर यांनी मानले. समारंभात श्री पी डी पाटील सरांच्या वतीने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थित सर्व मान्यवरांना सुरूची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!