अमळनेरात रेल्वे स्टेशन व बस स्थानक येथून दोन मोटरसायकल गेल्या चोरीला…

अमळनेर येथील रेल्वे स्टेशन च्या पार्किंग मधून एक तर बस स्थानकासमोरील हॉटेल बाहेर लावलेली एक अशा २ मोटरसायकल गेल्या चोरीला.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील गलवाडे रस्त्यावरील प्रोफेसर कॉलनीतील रहिवासी कुणाल सातपुते हे रेल्वे स्टेशन जळगाव जाण्यासाठी आपल्या मोटरसायकल ने घरून स्टेशन वर गेले.तिथे त्यांनी रेल्वेच्या पार्किंग मधे वाहन लावले.व रेल्वेने जळगाव येथे गेले.सायंकाळी ७ वाजता अमळनेर रेल्वे स्थानकाबाहेर पोहोचले असता त्यांना त्यांची मोटारसायकल आढळुन आली नाही.तेथील सीसीटिव्ही फुटेज चेक केले असता तीन अज्ञातांनी गाडी लंपास केल्याचे दिसून आले.सातपुते यांच्या फिर्यादीवरून २० हजार रुपये किमतीची मोटरसायकल लंपास केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या घटनेत नितीन दीक्षित हे मित्रासोबत बसस्थानक समोरील एका हॉटेल मध्ये जेवणासाठी आले असता त्यांनी त्यांची हिरो कंपनीची मोटारसायकल हॅण्डल लॉक करून हॉटेल बाहेर लावून ते आत जेवायला गेले.जेवण करून बाहेर आले असता त्यांना मोटारसायकल आढळून आली नाही.इतरत्र शोध घेतला असता त्यांना मोटारसायकल कुठेही दिसली नसल्याने नितीन दीक्षित यांच्या फिर्यादीवरून मोटारसायकल हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
दोन्ही घटनाचा तपास हे.कॉ नाना पवार व हे.कॉ अशोक पवार हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!