अमळनेरात एका चिमुरडीला भरधाव चारचाकीने उडविल्याने झाला मृत्यू ….

अमळनेर येथील लोण बु. येथे मामाकडे आपल्या आई सोबत आलेल्या तमन्ना सिद्धार्थ भालेराव व अर्चना सिद्धार्थ भालेराव हे सर्व आपल्या गावी चावलखेडा ता.धरणगाव येथे जाण्यासाठी मामासह लोण फाट्यावर बसची वाट पाहत असताना अमळनेर कडुन भरधाव येणाच्या स्विफ्ट डिझायर या चारचाकी (क्र. एमएच १९ बीयु ३५५३) चालवणाऱ्या आशिष महाजन रा पिंपराळा, जलगावं याने बसची वाट पहात उभे असलेल्या अर्चना व तमन्ना या दोघांना जोरदार धडक दिली. जोरात गाड़ी असल्याने सदर गाडी मुलींना धडक देऊन रस्त्या शेजारील कापसाच्या शेतात बांधावरून तब्बल पंधरा फूट लांब वर पलटी झाली. त्यावेळी ग्रामस्थानीं धाव घेत अर्चना व तमन्ना याना उचलले असता तमन्ना हिच्या डोक्याला, पायाला व शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या व ती काहीच बोलत नव्हती,तसेच अर्चना हीचा पाय मोडला होता. दोन्ही गंभीर मुलींना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.त्याठिकाणी तमन्ना हिला डॉक्टरांनी मयत घोषित केले तर तिची लहान बहीण अर्चना हिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने तिच्यावर उपचार सुरू आहे. त्यादरम्यान सदर गाडी चालक त्या ठिकाणावरून पळ काढत अमळनेर पोलिस ठाण्यात जाऊन मेडिकल मेमो घेऊन जळगांव येथे उपचारासाठी गेला असल्याचे समजते.

याप्रकरणी लोण बु. येथील अनिल खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल भरत ईशी करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!