अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी केली स्ट्रॉंग रूम ची पहाणी… निवडणुकीत कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत पोलीस अधिकारी,कर्मचारी व होमगार्डनां केले मार्गदर्शन.

अमळनेर येथिल विधानसभा निवडणूक प्रचाराची धामधूम संपली असली तरी मतदान दिवसाची पूर्व तयारी करण्यात महसूल सह पोलीस प्रशासनाने कसली कंबर.

अमळनेर विधानसभा निवडणूक ही शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडवी म्हणून पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या परिक्षेत्रात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.निवडणूक प्रक्रिया दरम्यान नजर ठेवण्यासाठी १ ड्रोन कॅमेरा, ५ व्हिडीओ ग्राफर तैनात केले आहे.याकामी १५ अधिकारी,३६५ पोलीस कर्मचारी,२५० होमगार्ड,१ एसआरपी तुकडी,१०० आय.टी.बी.पी चे जवान तैनात करण्यात आले आहे.यातील तब्बल १० पोलीस अधिकारी हे सेक्टर पेट्रोलिंग साठी तैनात केले असून यांच्यावर दोन प्रभारी अधिकारी लक्ष ठेवून असणार आहे. या सर्वांना अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी कायदा सुव्यवस्था राखण्याकामी शहरातील कलागुरू मंगल कार्यालयात मार्गदर्शन केले.तत्पूर्वी त्यांनी शहरातील स्ट्रॉंग रूम व परिसराची पहाणी करून अमळनेर पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या कडून सुरक्षे बाबत माहिती घेतली व काही सूचना दिल्या.या प्रसंगी एपीआय जगदीश गावित,एपीआय जीभाऊ पाटील,एपीआय रविंद्र पिंगळे,पीएसआय भगवान शिरसाठ,पीएसआय युवराज बागुल,पीएसआय राहुल बोरकर,पीएसआय विनोद पाटील,पीएसआय नामदेव बोरकर सह बाहेरील सह पोलीस अधिकारी उपस्थित होते.

अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर…. मतदारांनी कोणत्याही अफवा अथवा आमिषाला बळी न पडता बिनधास्त मतदानाला घरा बाहेर पडून संविधानाने दिलेला अधिकार बजवावा.आपल्या परिसरात काही विपरीत घटना घडत असल्यास त्वरित पोलीस प्रशासनास कळवाव्यात.सदर ची निवडणूक ही शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे तसेच कोणीही कायदा हातात घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!