अमळनेर येथिल सर्वसामान्य जनतेने शिरीषदादा चौधरी यांच्यावर मागील काळात जो विश्वास दाखवला होता तोच विश्वास दाखवून यावेळी शिरीष दादा चौधरी यांना एक संधी द्या अमळनेर विधानसभा मतदारसंघ आम्ही सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही. ही विकासकामे अशीच अखंडितपणे सुरू राहावीत यासाठी अमळनेर मतदारसंघाचा शाश्वत विकासाचा चेहरा असलेल्या शिरीषदादा चौधरी यांच्याशिवाय पर्याय नाही. असे पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.दिपक पाटील, डॉ. चेतन ठाकरे, यांनी वेक्त केला.
कोरोना काळात शिरीष दादा चौधरी यांनी निस्वार्थ केली जनतेची सेवा..
शिरीषदादांनी २०१४ पासून राजकारणातून लोकसेवेचे व्रत हाती घेतलेले आहे. जातपात न करता त्यांनी सर्व समाजांना सोबत घेत आपली भूमिका म्हणजे जाणसामान्य भूमिका आहे. मतदारसंघवासीयांचे जीव वाचावेत म्हणून स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य अमळनेर तालुका कसे विसरेल ज्यांनी जातीचा वापर करून आमदारकी व मंत्री पद मिळवले त्यांच्या डोक्यात मंत्रीपदाची हवा गेली. त्यांनी जात, समाज आणि मतदारसंघाकडे पाठ फिरवत मंत्रीपदासाठी माती खाल्ली. हा मुडी मांडळ गट यांना नक्कीच त्याची जागा दाखवल्या शिवाय शांत राहणार नाही.
यावेळी शिरीष दादा चौधरी यांनी बोलताना असे म्हटले की..
पीक विमा, दुष्काळी निधीसाठी शेतकरी हवालदिल आहेत. विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार वाऱ्यावर आहेत. महिलांसाठी असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत छेडखानीच्या प्रकारासंह गुंडगिरीने कळस गाठला आहे. प्रशासनावर आणि पोलिस यंत्रणेवर नियंत्रण राहिलेले नसून कमिशन आणी टक्केवारी साठी हा उठा ठेव सुरू आहे. माझ्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात महिला सुरक्षिततेचे व भयमुक्त वातावरण होते. आमदारच होतो पण दरारा आणि कामे मंत्र्यापेक्षा जास्त केलीत. शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण, यांच्यासाठी पोषक वातावरण होते. माझ्या कडे काम घेऊन आलेल्या कोणाचीच भावना निराश होत नव्हती. प्रत्येकाची समस्या समजून घेत ती सोडवण्यासाठी आतोनात माझा प्रयत्न असतो.
पिक विमा संदर्भात बोलताना शिरीष चौधरी म्हटले की..
तालुक्यातील शेतकरी डीपीच्या मागणी साठी मंत्री महोदयांकडे गेले असता त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. पीक विम्यासाठी तरसावले जाते. तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुका म्हणून केला जात नाही. आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन या खात्याचा मतदारसंघासाठी उपयोग केला जात नाही. स्वत:ला भूमिपुत्र म्हणून घेणारे समाजावर आणि मतदारसंघावर सूड उगवत आहेत. निवडणुका येताच आता समाजाची आठवण त्यांना येत आहे. मात्र त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत याची जाणीव समाजासह मतदारसंघाला झाली आहे आणि या मतदानच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जनसामान्यांच्या भावना दुखावणाऱ्याची जनता त्याच्या उपकाराची कसे परतफेड करते हे त्याने बघावेचं. शेवटी बोलताना ते असे म्हणाले की सहा बॉल मध्ये सहा सिक्स लावताना याला तालुक्यातून हद्दपार करा हा खरा भूमिपुत्र नाही.
यावेळी मंचावरअमळनेर पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.दिपक पाटील, डॉ. चेतन ठाकरे, वावडे माजी सरपंच एन आर ठाकरे, माजी सरपंच मांडळ बाळासाहेब पवार, जितु बापू पाटील, रावसाहेब कोळी, माजी सरपंच मूडी प्र.डा. संजय युवराज पाटील, काशिनाथ माळी, नाना चौधरी, माजी सरपंच बोदर्डे संतोष चौधरी, सोनु संदानशिव, लोण चे माजी सरपंच किसन जिभाऊ पाटील, नाना पाटील, संपूर्ण मुडी मांडळ गट. इ. उपस्थिती होतें.