गणेश मिरवणुकीत दगडमारून सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तंत्रज्ञानाचा आधार घेत केले अटक – पोलिसांच्या तत्परतेचे होत आहे सर्वत्र कौतुक

 

अमळनेर प्रतिनिधी ,गणेश मिरवणुकी दरम्यान सामाजिक सलोखा बिघडविण्यात हात असलेल्या खऱ्या आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना आले यश.

सविस्तर वृत्त असे की,शहरातील गांधलीपुरा भागातील पारधीवाडा येथील दोस्ती ग्रुप व जय मातादी गणेश मंडळाची मिरवणूक जात असताना गुलाल व डी जे वरून वाद झाला असता एकाने मिरवणुकीतील लोकांवर दगड मारले. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.त्याप्रसंगी हिंदुत्ववादी संघटनानीं एकत्र येत फरशी पुलाजवळ गणेश मिरवणूक थांबवून ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर , पोलीस निरीक्षक विकास देवरे , सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश गावित ,पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ ,पोलिस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे ,नामदेव बोरकर यांनी त्वरित धाव घेत आंदोलन कर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.दरम्यान शहरात शांतता राहावी म्हणून पोलिस प्रशासनाने डॉ संजय शहा ,विजय पाटील ,सूरज परदेशी ,राकेश पाटील यांच्याशी चर्चा करून आंदोलन स्थगित करून मिरवणूक सुरू करण्याचे आवाहन केले असता त्यांचा मान राखत सदरचे ठिय्या आंदोलन स्थगित करून सहकार्य केले.

सदर घटनेची माहिती मिळताच वेळ नदवडता पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी ,अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी घटनास्थळी धावघेऊन विविध ठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला.

सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्याचा तात्काळ तपास अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर ,डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोनि विकास देवरे आदी अधिकाऱ्यांनी सुरू केली.घटनेच्या ठिकाणचे व्हिडिओ फुटेज तपासून मिरवणुकीत विघ्न आणणारा आरोपी साबीर कैसर शेख असल्याची खात्री केली व त्याला तात्काळ अटक करून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ११० , २९८ , २९९ ,३०० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्या अमिता यादव यांनी आरोपीस २० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी समतोल साधत दोन्ही बाजूने शांतता निर्माण करत खरा आरोपी शोधून त्याला जेरबंद केल्याबद्दल पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. आंदोलन कर्त्यांनी देखील संयम राखला त्याबद्दल त्यांचेही सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!