१७ वर्षीय किसन या तरुणाने घेतला गळफास..
अमळनेर येथील मेहतर कॉलनीतील १७ वर्षीय किसन दिलीप भिल याने आपल्या स्वतःच्या घरात छताच्या लाकडी दांड्याला साडी बांधून गळफास घेतल्याची घटना १ रोजी रात्री घडली.
सविस्तर वृत्त असे की, किशन हा तरुण रात्री बाहेरून आल्या नंतर दरवाजा लावून घेतला. दरम्यान त्याचे वडील यांनी जेवणासाठी आवाज द्यायला गेले असता किसन येणे उत्तर दिले नाही म्हणून दरवाजा तोडून पाहिले असता त्याने साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले. वडिलांनी इतरांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी किसन यास मयत घोषित केले. वडिलांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल नाना पवार करीत आहेत.मात्र त्याने असे का केलं याबाबत चर्चेला उधाण आले आहे.