अरेव्वा…जळगाव एलसीबीची मोठी कौतुकास्पद कारवाई…. तब्बल एक कोटी ७८ हजाराचा अवैध गुटख्या पकडण्यात मिळाले यश.

जळगाव येथील एलसीबी ने मुक्ताईनगर पूर्णाड फाट्याला वसई कडे महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा अवैध रित्या वाहतूक करणाऱ्या ट्रकला पकडले.

सविस्तर वृत्त असे की,दिनांक १ डिसेंबरला स्थानिक गुन्हा शाखेचे पोह दिपक माळी व पोकॉ रविंद्र पाटील यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला प्रतिबंधीत गुटखा हा मालट्रक क्रमांक NL01 – AJ 1725 ह्यात दिल्ली येथून मध्यप्रदेश राज्यातुन महाराष्ट्रातील मुक्ताईनगर मार्गे येवून मुंबई येथील वसई येथे जात असल्याचे खात्रीशीर बातमी मिळाली, त्यावरून मा.श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थागुशा जळगाव यांनी सदरची बातमीची खात्री करून पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेत.त्याप्रमाणे दिनांक ०१/१२/२०२४ रोजी पुर्नाड फाटा मुक्ताईनगर येथे मिळलेल्या बातमीतील मालट्रक क्रमांक NL01- AJ 1725 थांबवुन त्यामधील मालाची खात्री केली असता सदर मालट्रक मध्ये १ कोटी ७८ लाख ६६ हजार ०८० रुपये किंमतीचा महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला प्रतिबंधीत गुटखा मिळून आला. संशय येऊ नये म्हणून त्यावर तिहेरी ताडपत्री टाकली होती.पोलिसांनी चौकशी केली असता तयार गुटखा आढळून आला.चालकाला नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सकसरुल्ला अब्दुल अजीज वय ३५ रा इमाम नगर ता जेरका फिरोजपुर जिल्हा नऊहू मेवात राज्य हरियाणा असे सांगितले तर गाडीतील दोघांनी आपली नावे कैफ फारुखखान वय १९रा ढळायत ता पहाड़ी जिल्हा भरतपूर राज्य राजस्थान व तारीक लुकमान खान वय २३ रा इमाम नगर हरियाणा असे सांगितले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.त्याबाबत मुक्ताईनगर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्या मध्ये मिळालेला प्रतिबंधीत गुटखा मिळून मालट्रक व इतर मुद्देमाल असा एकुण २ कोटी ८ लाख ८२ हजार ५८० रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोउपनिरी श्री दत्तात्रय पोटे, पोह दिपक माळी, रविंद्र पाटील, मुरलीधर धनगर, सचिन पोळ सर्व स्थागुशा जळगाव अश्यांनी केली आहे.सदरची कारवाई मा.डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव (जळगाव चार्ज), मा.श्री. बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक, स्थागुशा जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!