अमळनेर येथील ताडेपुरा भागात रहिवास असलेल्या एक महिला पोलिस कर्मचारी दादागिरी व शिवीगाळ करीत असल्याची तक्रार स्थानिक महिलांनी पोलिस ठाण्यात केली.
सविस्तर वृत्त असे की, ताडेपुरा भागात राहणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचारी च्या घरात गल्लीत क्रिकेट खेळणाऱ्या मूलांचा चेंडू घरात गेल्याने त्या महिला
पोलिस कर्मचारी यांनी घरात चेंडू घ्यायाल गेलेल्या मुलावर विनयभंग केला म्हणून पोलिसात गुन्हा
दाखल केला आहे. मात्र या वादात महिला पोलिसाला समजावण्यास गेलेल्या महिलांना दादागिरी आणि शिवीगाळ करण्यात आल्याची तक्रार ताडेपुरा भागातील महिलांनी पोलीस ठाने गाठून त्यामहिला
पोलिसविरुद्ध कारवाई करण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे.