अमळनेर प्रतिनिधी, येथील अमळगाव सह जैतपिर येथे मारवड पोलिसांनी छापा टाकून गावठी दारू तयार करणाऱ्या तिघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मारवड पोलिसांच्या पथकाने १७ रोजी जैतपिर येथे छापा घालून गावठी दारू तयार करणाऱ्या तिघांना रंगेहाथ पकडले. नाना सोमा कोळी (वय ६५), रामलाल शालिक पवार (वय ५५) व पांडुरंग हिरामण कोळी (वय ५४) अशी तिघांची नावे आहेत. यावेळी एकूण ४४ हजार रुपये किमतीचे २२०० लिटर कच्चे रसायन, ४ हजार किमतीची ८० लिटर तयार दारू असा एकूण ४८ हजार किमतीचा मुद्देमाल मिळून आला. नमुने घेवून उर्वरित साहित्याचा जागीच नाश करण्यात आला. पीएसआय विनोद पाटील, हेकॉ सुनील तेली, भरत ईशी, मुकेश साळुंखे, संजय पाटील, विनोद साळी आदींनी सदरची कारवाई केली असून याप्रकरणी तिघांविरुद्ध दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.
तर दुसऱ्या कारवाईत अमळगाव शिवारातील चिखली नदी काठच्या झुडपात रामचंद्र कोळी नामक व्यक्तीला गावठी दारू हात भट्टी सह रसायन जागेवर आढळुन आल्याने व इतर सामान असे 14,600/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व रामचंद्र कोळी यांच्या वर महाराष्ट्र दारू बंदी कायदा 1949 कलम 65 (फ,ब,क,इ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई सहायक पोलिस निरीक्षक जीभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील,हेकॉ भरत ईशी, संजय पाटील, आदींनी केली.