नाशिक प्रतिनिधी, येथील पेठ तालुक्यात गाव खेड्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढल्याने ग्रामस्थ त्रस्त असल्याने सदर धंदे बंद करण्याची मागणी जोर धरत आहे.
सविस्तर वृत्त असे की,संविधान हक्क परिषद जिल्हा महिला विभाग प्रमुख सुमनताई फसाळे, पेठ तालुका प्रमुख कमल ताई भोये, उपाध्यक्ष रंजना गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पेठ तालुक्यातील अवैध दारू धंदे बंद करावेत यासाठी पेठ पोलीस स्टेशनला वारंवार विनंती अर्ज केले परंतु पेठ पोलीस स्टेशन कडून कुठलीही दखल घेतली जात नाही म्हणुन संविधान हक्क परिषद चे महासचिव ऍड अनिल अहिरे संस्थापक व महागायिका निशा ताई भगत, राज्य सचिव ऍड विजय पवार, नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष सुमन ताई फसाळे गायिका आशा लता भगत नाशिक जिल्हा उपाध्यक्ष आकाश गांगुर्डे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय गवारे, दिंडोरी तालुका अध्यक्ष शाम गवारे, जिल्हा महिला संघटक सविता ससाने, येवला पदाधिकारी बबन कानडे, पेठ महिला तालुका अध्यक्ष कमल ताई भोये, उपाध्यक्ष रंजना गवळी, बबन वारजे आदींनी पेठ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कैलास दरगुडे यांची भेट घेऊन अवैध धंदे बंद करण्यासाठी मागणी केली. तसेच शाळा, कॉलेज, मुलींची वसतिगृह, आश्रम शाळा याठिकाणी ही अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले.सदर अवैध दारू गुजरात वरून आणली जात असल्याचे यावेळी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले.हे धंदे कुणाच्या आशीर्वादाने सुरु आहेत ? याचा शोध घ्यावा,तसेच सदर अवैध धंदे जर एका आठवड्यात धंदे बंद झाले नाही तर राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून याबाबत कारवाई ची मागणी करणार असल्याचे यावेळी महा सचिव ऍड अनिल अहिरे यांनी सूचित केले.
पोलीस निरीक्षक कैलास दरगुडे…..”आठ दिवसात सर्व अवैध धंदे बंद करू”.