अमळनेर येथील शामकांत सुधाकर बडगुजर यांच्या लोसन पुरा शिवार गट न.95 प्र. डागरी येथील शेतात अज्ञात व्यक्तीने दि. 19/12/2024 रोजी वेळ संध्याकाळी.05.00 वाजेचे सुमारास शेतशिवारातील बोअरींग च्या वायरमध्ये लोखंडी खिळा ठोकुन नुकसान केल्याचे आढळून आले. अज्ञात आरोपीने खिळा ठोकल्याने विजेचा झटका लागून मृत्यू होण्याची दाट शक्यता असल्याचे श्यामकांत बडगुजर यांनी करडी नजर न्यूज शी भ्रमणध्वनी द्वारे वर्तविले आहे.तसेच हे कृत करणाऱ्या व्यक्तीला त्वरित अटक करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
या बाबत मारवाड पोलिस ठाण्यात बी एन एस (2023) 324(2)(6) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनी यांचे आदेशाने पुढील तपास पोहे संजय पाटील हे करित आहेत.