अमळनेर प्रतिनिधी, येथील गांधलीपुरा भागातील एका २८ वर्षीय महिलेचा खून झाल्याने शहरात चर्चेला उधाण.
सविस्तर वृत्त असे की, मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार सकाळी १० वाजेच्या सुमारास शीतल जय घोगले वय 28 रा गांधलीपुरा ही महिला मृत अवस्थेत नदी काट च्या परिसरात रिकाम्या जागेत पडलेली दिसून आली.सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर ,पोलीस निरीक्षक विकास देवरे , पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील , गणेश पाटील , सागर साळुंखे ,निलेश मोरे ,जितेंद्र निकुंभे ,अमोल पाटील , सिद्धांत शिसोदे , स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे , रवी पाटील ,दीपक माळी ,प्रवीण मांडोळे , संदीप पाटील यांनी धाव घेतली.
दरम्यान सदर महिलेला डोक्याला मार लागलेला असल्याचे दिसून आले,तसेच तिचा गला आवळल्याचे व्रण दिसून आले,हातावरील नस कापलेल्या अवस्थेत दिसून आले.
महिलेचे शव विच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.सदर गुन्ह्यातील आरोपीला त्वरित अटक करण्यात यावी म्हणून आग्रह धरला.पोलिसांनी विविध दिशेने तपास चक्रे फिरवायला सुरुवात केली आहे व लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल,असे मत पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी व्यक्त केली आहे.