अमळनेर , येथील गांधलिपुरा भागात मेहतर कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेचा पहाटे खून झाल्याची घटना घडली.पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून आरोपी सुटणे अशक्य असल्याने तपासात अवघ्या तीन तासात आरोपी चक्रव्यूह मध्ये अलगद अडकत गेले.
सविस्तर वृत्त असे की, गांधलि पुरा भागात राहणाऱ्या पारोबाई घोगले या सफाई कामगार असल्याने दारुड्या मुलगा एवजी सून शीतलला त्या जागेवर नोकरी लागेल या विचाराने पारोबाईची मुलगी मंगला हीने प्रियकर करण घटायडे याला सोबत घेऊन शीतलला संपवण्याचा कट केला व आज दिं २३ रोजी पहाटे शीतल व मंगल शौचाला जवळील झुडप्यात गेले असता शौचा वरून काही मिनिटातच मंगला परत आल्याने पारोबाई हीने सून शीतल परत का आली नाही म्हणून मुलगी मंगलास विचारताच मुलीने तू पाणी भर मी लाकड घेऊन येते सागून पारोबाई याना जाण्यास सांगितले.काही वेळे नंतर सून घरी परतली नाही म्हणून आजूबाजूला शोध घेतला असता सून शीतल काटेरी झुडपात जखमी अवस्थेत आढळून आली.तिला डोक्यावर,हातावर गंभीर जखमा दिसून आल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी शीतल हिस मृत घोषित केले.
दरम्यान नातेवाईकांनी आरोपींना ताब्यात घेतल्या शिवाय प्रेत न उचलण्याचा प्रण केल्याने पोलिसांनी नातेवाइकांची समजूत काढून प्रेत इंनकॉमेरा शविच्छेदनासाठी धुळे येथील वैदयकीय महाविद्यालयात पाठविले.
मात्र इकडे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवालकर, पोलिस निरीक्षक विकास देवरे,एपिआय बोरकर ,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे उप निरीक्षक दत्तात्रय पोटे,रवी पाटील,दिपक माळी,प्रवीण मांडोळे,हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील गणेश पाटील,निलेश मोरे,जितेंद्र निकुंभ,अमोल पाटील, सिद्धांत शिसोदे,मिलिंद सोनार,विनोद संदानशीव,होमगार्ड पूनम हटकर आदींनी तपासाचे चक्रव्यूह आखून अवघ्या तीन तासात मुलगी मंगला हिला खाकीचा दणका देताच आपण नोकरी मिळावी म्हणून प्रियकर करण याच्या सोबत संगनमताने शीतलला खून केल्याची कबुली दिली.पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे करीत आहे.
पोलिसांनी सदर खुनाचा तपास आपल्या बुध्दी कौशल्यावर चक्रव्यूह आखून अवघ्या तीन तासात उलगडा केल्याने सर्वच स्तरातून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आणि करडी नजर ने वर्तविलीले भाकीत खरे ठरले.