अमळनेर प्रतिनिधी ,भारत सरकार, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली, राष्ट्रीय सेवा योजना (मंत्रालय कक्ष), उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव यांच्या मार्गदर्शनाने, दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग, प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर यांच्या वतीने अमळनेर बस स्थानकावर “स्वच्छता ही सेवा” अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
प्रस्तुत मोहिमेत 100 हून अधिक NSS स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला आणि प्लास्टिक व इतर कचऱ्याचे संकलन करून परिसर स्वच्छ केला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण बी. जैन यांनी स्वतः सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वृद्धिंगत केले.
या सक्रिय सहभागाबद्दल बस आगारातील पदाधिकाऱ्यांनी मानवतावादी उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या कार्यावर समाधान व्यक्त केले.
सदर उपक्रमात प्रमुख उपस्थिती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिसभा सदस्य तथा संस्थेचे सहसचिव डॉ.धिरज वैष्णव, सिनेट सदस्य प्रा.डॉ.एस बी नेरकर यांची उपस्थित व सहकार्य होते. त्यांनी उपस्थितांना स्वच्छतेच्या महत्त्व सांगून सर्व विद्यार्थ्यांना प्रेरीत केले.
प्रस्तुत स्वच्छता अभियानाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.हेमंत पवार आणि सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.सुनील राजपूत यांनी केले. या उपक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.सचिन नांद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
दिनांक 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2024 दरम्यान प्रताप महाविद्यालयात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत आणि स्वच्छता मोहीम हा त्यातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम होता.