धुळे प्रतिनिधी, येथील विद्यार्थी विकास विभाग व कबचौ उमवि जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आत्मनिर्भर युवती सप्ताह कार्यक्रमांतर्गत आज तिसऱ्या दिवसाचे पुष्प गुंफण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विजय एच.उभाळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने कु. वर्षा चव्हाण व कु.निकिता पाटील यांनी स्वागत गीताने केली. सर्व प्राध्यापक वृंद व प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलन प्रतिमा पूजन करून पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी सूर्यवंशी सर यांनी केले .तर पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. सुजाता निकम यांनी करून दिला.
तिसरे पुष्प गुंफताना डॉ. स्वाती प्रशांत खैरनार यांनी सांगितले की, युवक व युवती यांच्या बदलत्या वयानुसार शारीरिक ,हार्मोनिक, वैचारिक, मानसिक कसे बदल होतात .असे बदल हे या वयामध्ये नैसर्गिक होत असले तरीसुद्धा त्याकडे बुरसटलेल्या, जुनाट विचारांनी न बघता वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगला पाहिजे व वेळोवेळी येणाऱ्या समस्या असतील त्या तज्ञ डॉक्टरांशी शेअर करून पुढे भविष्यामध्ये अडचणी निर्माण होणार नाही. अगदी स्त्रियांना येणारी मासिक पाळी ,लठ्ठपणा चेहऱ्यावर येणारे पुरळ ,अंतर्गत असणाऱ्या समस्या, हिमोग्लोबिनचा असंतुलन, पाळीच्या काळामध्ये असणारी मानसिक स्थिती व त्यातून निर्माण होणारे अनेक क्लिष्टता या सर्व गोष्टींचा पुढील आयुष्यावर परिणाम करतात आणि काही वेळा जीव घेणेही ठरते.हे सांगत असतानाच त्यांनी आहार विहार व निद्रा या तिन्ही गोष्टी योग्य वेळेवर व्यवस्थित केल्या तर निश्चितच आपलं आरोग्य उत्तम राहील असे मौलिक विचार मांडले .
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. व्ही एच उभाळे यांनी विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी आपल्या बदलत्या वयानुसार सजग सतर्क व जागृत असले पाहिजे .जेणेकरून अशा समस्या झाकून ठेवल्याने समस्या उद्भवू शकतात म्हणून कुठलीही गोष्ट लपवून न ठेवता ती तज्ज्ञांशी बोलुन स्पष्ट केली गेली पाहिजे. असा त्यांनी मोलाचा सल्ला दिला.
प्रा. डॉ. एन.झेड. पाटील,प्रा. डॉ. एस जे पाटील ,प्रा. डॉ. ए.बी. सोनवणे , प्रा.डॉ. एस के कदम,प्रा. डॉ.के डी बागुल, विभाग.विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. सुजाता निकम, प्रा. छाया पाटील ,प्रा विजय बी. शिंदे, प्रा .पराग बोरसे ,प्रा. प्रमोदजी पाटील ,शिक्षकेतर कर्मचारी वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू-भगिनी यांच्या सकारात्मक व जाणून घेण्याच्या वृत्तीने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.डॉ.यु वाय गांगुर्डे यांनी सर्व विद्यार्थ्यांना व सर्व मान्यवरांची उपस्थितांचे आभार मानले.