अमळनेर प्रतिनिधी ,येथील संगणक शास्त्र विभाग,प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान(रुसा) यांच्या संयुक्त विद्यमाने *संशोधन आणि नवकल्पना* यामध्ये जागरूकता या विषयावर एक दिवसीय अतिथी व्याख्यान दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आले होते.
प्रस्तुत व्याख्यानासाठी धुळे येथील एस व्ही के एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील प्राध्यापिका डॉ. कविता टी पाटील ह्या अतिथी व्याख्याता म्हणून उपस्थित होत्या. अतिथींचे स्वागत संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा.पुष्पा पाटील यांनी केले तर प्रा.अमित शिंदे यांनी अतिथींचा परिचय करून दिला. प्रस्तुत व्याख्यानात डॉ.कविता पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार(एनईपी) संशोधन आणि नवकल्पना यामध्ये जागरूकता व त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले आणि नवनवीन संशोधन संबंधी मौलिक मार्गदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमासाठी बी.एस्सी व एम.एसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्तुत समारंभाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. अरुण बी जैन, उपप्राचार्य डॉ.विजय तुंटे डॉ.धीरज वैष्णव, डॉ.मुकेश भोळे यांनी मार्गदर्शन केले तसेच संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा.पुष्पा पाटील व त्यांचे सर्व सहका-यांनी परिश्रम घेतले.