अमळनेर प्रतिनिधी येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय,अमळनेर राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने युवक खेळ कल्याण मंत्रालय नवी दिल्ली राष्ट्रीय सेवा योजना ,मंत्रालय कक्ष उच्च व तंत्र शिक्षण विभाग ,मुंबई तथा प्रादेशिक संचालनालय पुणे यांच्या निर्देशानुसार आज दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी मोहिम सुरू झाली.
“स्वच्छ्ता ही सेवा उपक्रम” अंतर्गत “स्वभाव स्वच्छ्ता, संस्कार स्वच्छता अभियान”
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील साईबाबा मंदिर पैलाड, व उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात स्वच्छता ही सेवा उपक्रम अंतर्गत स्वच्छता अभियान करण्यात आले. उपस्थित नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा विजयकुमार वाघमारे, प्रा.डॉ. अनिता खेडकर व राष्ट्रीय सेवा योजना सर्व स्वयंसेवक सहभागी झाले होते. सदर अभियानास प्राचार्य डॉ पी एस पाटील व सहकारी प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले आहे.