अमळनेर प्रतिनिधी,येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय आणि ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गर्ल्स प्रोटेक्शन मिशन अंतर्गत एड ललिता पाटील आणि वसुंधरा लांडगे यांचे व्याख्यान दिनांक 24 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन विशाखा समितीने केले होते.
यावेळी बोलताना एड ललिता पाटील यांनी महिलां विषयीचे कायदे, महिलांनी वावरताना घ्यावयाची काळजी इत्यादी बाबत मौलिक मार्गदर्शन केले. तर महिलांचे चरित्र महत्त्वाचे असून ते जपण्यासाठी काळजी घेतली पाहिजे असे आवाहन वसुंधरा लांडगे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. उल्हास मोरे प्रा. दिनेश भलकार प्रा. श्री सूर्यवंशी प्रा.सुनील पाटील इत्यादी उपस्थित होते.
वक्त्यांचा परिचय विशाखा समितीच्या अध्यक्षा प्रा. शालीनी पवार यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा प्रतिमा लांडगे तर आभार प्रदर्शन प्रा. पूनम शिंदे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. बी आर गुलाले प्रा. जी एल धनगर प्रा.डी के तायडे,प्रा.दिनेश ठाकुर प्रा. प्रतिभा पाटील, प्राध्यापिका मंदाकिनी भामरे, प्रा.मनीषा पाटील. प्रा.कामिनी खैरनार ,प्रा.कविता माळी प्रा.सविता पाटील ,प्रा.मेघना पवार,प्रा.रोहीणी पाटील,प्रा. जागृती पाटील,प्रा.श्वेता पाटील, प्रा.पुनम चोपडे ,प्रा.किर्ती पाटील, प्रा.सुचित्रा रत्नपारखी यांनी परिश्रम घेतले.