अमळनेर प्रतिनिधी, येथील प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) आणि रुसा संस्थेच्या वतीने प्रायोजित व्याख्यान दि 4 सप्टेंबर बुधवार रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात दुपारी 12.00 वा संपन्न होणार आहे.
प्रस्तुत व्याख्यान “समाजशास्त्रातील संशोधन पद्धती” या विषयावर होणार असून प्रमुख वक्ते जेष्ठ इतिहास संशोधक, माजी अधिष्ठाता ,इतिहास अभ्यास मंडळ, चेअरमन, मानव विद्या शाखा क.ब.चौ. उ.म.वि.,जळगाव मा.डॉ.भि.ना.पाटील .तसेच माजी प्राचार्य एम. एम. महाविद्यालय माजी प्राचार्य, हे मार्गदर्शन करणार आहेत. सदरच्या समारंभासाठी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ अरुण जैन सर आणि संस्थेचे सह सचिव डॉ.धीरज वैष्णव यांची उपस्थिती लाभणार आहे.
तरी सर्व पदवी, पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी, संशोधक, मार्गदर्शक व प्राध्यापक, समाजातील अभ्यासक बंधू-भगिनीनी यांनी प्रस्तुत व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतिहास विभाग व संशोधन केंद्र तसेच सामाजिकशास्त्राच्या विविध विषयाचे विभाग प्रमुख आणि महाविद्यालयीन प्रशासन यांच्या कडून करण्यात येत आहे.