गौरीशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनींना गुड टच बॅड टच याबाबत करण्यात आले मार्गदर्शन
अमळनेर प्रतिनिधी,महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग यांच्या आदेशानुसार व नवलभाऊ प्रतिष्ठान चे अध्यक्ष माननीय नानासाहेब विजय नवल पाटील व कार्याध्यक्ष माननीय बाळासाहेब अनिकेत विजय पाटील यांच्या सूचनेनुसार गौरीशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी विद्यार्थिनींना गुड टच बॅड टच या विषय बाबत समुपदेशन मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य आर एस सानप सर हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून मेहराज मकसूद हुसेन व अंजू विजय ढवळे सामाजिक कार्यकर्ते कायद्याचे अभ्यासक अमळनेर व रवणजे येथील पोलीस पाटील सौ शरयू ताई गणेश चौधरी, विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक आर झेड पाटील सर, मंगेश पाटील,सौ शिल्पा मॅडम, सौ हुजरे मॅडम हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक आर झेड पाटील सर यांनी केले तर सूत्रसंचालन सौ लता पवार मॅडम यांनी केलं.
यावेळी अमळनेर होऊन आलेले वक्ते यांनी विद्यार्थिनींना अतिशय सहजपणे आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटना व त्यापासून सावधगिरी व त्याबाबतीत उपाय योजना या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य सानप सर यांनी याबाबत आपण नुकतीच तक्रारपेटी सुद्धा विद्यालयात उपलब्ध करून दिलेली आहे व आपल्या विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे सर्व सुसंस्कारित व उच्च शिक्षित अनुभवीअसून सर्वांचं सूक्ष्म निरीक्षण असते व वेळोवेळी संस्थाचालक व प्रशासकीय अधिकारी माननीय आबासाहेब डी बी पाटील व मानद सचिव प्राध्यापक सुनील गरुड सर हे नियमित विद्यालयाला भेटी देत असतात, सखोल चौकशी करत असतात,स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन माननीय तात्यासाहेब संतोष पाटील, लालचंद भाऊकोळी, सरपंच, पोलीस पाटील यांचा संपर्क विद्यालयाशी असतो व विविध उपक्रम शासनाचे संस्थेचे आदेश वेळोवेळी या ठिकाणी कशाप्रकारे अंमलात आणले जातात व आपण कशा पद्धतीने आपला सर्वांगीण विकास व्यक्तिमत्व घडवलं पाहिजे याबाबतीत मार्गदर्शन केलं.शेवटी सौ हुजरे मॅडम यांनी आभार प्रदर्शन करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थिनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लाभले व विशेष सहकार्य व अमळनेर येथून व्याख्याते उपलब्ध करून दिल्याबद्दल सौ लता पवार मॅडम यांचे सर्वानी आभार मानले.