अंगणवाडी कर्मचार्यांच्या समस्या संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर यांनी मंत्री आदिती तटकरे यांना मांडल्या

 

मुंबई प्रतिनिधी,अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मानधन वाढीसह,दरमहा पेन्शन, मा.सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी मिळावी,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी कर्मचारी यांना सामाविष्ट करावे यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे राज्य आणि केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चे,धरणे,बहिष्कार असहकार,संप अशी अनेक प्रकारची आंदोलने केली.

त्याची दखल घेत राज्याच्या महीला व बालविकास मंत्री श्रीमती आदितीताई तटकरे यांनी आपल्या संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर यांच्याशी मंत्रालयातील त्यांच्या दालनात नुकतीच चर्चा केली.

सदर चर्चेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरीव मानधनवाढ देण्यासंबंधीचा प्रस्ताव महिला व बालविकास विभागाच्या वतीने वित्त विभागाकडे सुमारे दोन ते महिन्यापूर्वीच पाठविण्यात आला असून सेवानिवृत्ती नंतर दरमहा पेन्शन देण्याचाही प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचेही श्रीमती तटकरे यांनी सांगितले

वरील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी आणण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच मा.सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी लागु करण्याचा प्रस्तावही केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून तो मंजूर होणेसाठी पाठपुरावा सुरू असल्याचीही माहिती मंत्री महोदयांनी संघटनेला दिली.

मानधनवाढ आणि दरमहा पेन्शन देण्याचा प्रस्ताव विधानसभा निवडणुकीच्या आचासंहितेपूर्वी राज्य शासनाने मंजूर करावेत अशी आग्रही मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रस्ताव मंजूर न केल्यास निवडणुकीच्या तोंडावर अंगणवाडी कर्मचारी राज्यभर तीव्र आंदोलन करतील.

मानधनवाढ देणे प्रस्तावित आहे.त्याबाबत अजून निर्णय झालेला नाही म्हणून अंगणवाडी सेविका,मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांनी सोशियल मिडियामधील(व्हॉटसअप) कोणत्याही उलटसुलट चर्चांना आणि भूलथापांना बळी पडू नये.

आपल्या संघटनेच्या वतीने योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन सर्वाँना अवगत केले जाईल म्हणून कोणीही दिशाभूल होऊ नये असे आवाहन संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!