- श्री.एन.टी.मुंदडा ग्लोबल हायस्कु
अमळनेर प्रतिनिधी, येथील श्री.एन.टी.मुंदडा ग्लोबल हायस्कुल येथे शिक्षक पालक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पड़ली.
संस्थेचे अध्यक्ष श्री.ओमप्रकाश मुंदडा, चेअरपर्सन सौ.छायाभाभी मुंदडा,सहसचिव श्री.योगेशजी मुंदडा, प्राचार्य श्री. लक्ष्मण सर,प्राचार्या सौ. विद्या मॅँडम अडमिनीस्ट्रेटर सौ. दिपीका मुंदडा व श्री.अभिनय मुंदडा यांचे हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती पुजनाने करण्यात आली. त्यानंतर समेत वर्ग प्रमाणे पालक प्रतिनीधींची निवड करण्यात आली व त्यातुनच प्रि- प्रायमरी विभागासाठी श्री. मनिष धर्मेंद्र सैनानी व प्रायमरी विभागासाठी श्री संजय कृष्णा पाटील यांची अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली.त्यानंतर या समेत पालकांशी विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमावर आधारीत विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी नविन शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमाबाबत व विद्यार्थी व पालक यांच्या समस्यावर चर्चा करण्यात आली.शाळेचे प्राचार्य श्री. लक्ष्मण सर यांनी शाळेत होणा-या विविध उपक्रमांची माहिती व विद्याथ्थ्याच्या प्रगती साठी त्यांच्या अंगी शिस्त कशी लागेल यासाठी आम्ही व आमचा संपूर्ण स्टाफ कशा पध्दतीने महेनत घेतात या बाबत मार्गदर्शन केले. शाळेत होणा-या स्पर्धा परिक्षांविषयी देखिल सांगितले.शाळेत होणा-या स्पर्धा परिक्षांविषयी देखिल सांगितले.विद्यार्थी विविध क्षेत्रात कसे पुढे गेले आहेत,काही विद्यार्थी डॉक्टर तर काही विद्यार्थी एम.पी.एस.सी.,यु.पी.एस.सी च्या माध्यमातून विविध ठिकाणी उच्च पदावर गेले आहेत.याबाबत देखिल पालकांना माहिती दिली.
संस्थेचे अध्यक्ष श्री. ओमप्रकाशजी मुंदडा यांनी पालकांशी हितगुज करत त्यांच्या समस्या समजुन घेवुन समस्यांचे निरसन देखिल केले. पालकांनी शाळेत अजुन काय सुधारणा होवु शकते जेणे करून आमचा पाल्य एक सुसस्कृत व उच्चशिक्षीत होवु शकतो या बाबत सुचना दिल्या व संस्थेचे अध्यक्ष श्री.ओमप्रकाशजी मुंदडा यांनी आपल्या सुचनांचे निश्चितच पालन केले जाईल असे आश्वासन दिले. अशा प्रकारे विविध विषयांवर चर्चा होवुन सदर शिक्षक पालक सभा अतिशय खेळी-मेळीच्या वातावरणात पार पड़ली.