अमळनेर प्रतिनीधी येथील शिक्षक भरती टप्पा-२ (PHASE-२) मध्ये नगरपरिष उर्दू माध्यमाच्या शिक्षकांची जास्तीत जास्त पदे पवित्र पोर्टल मार्फत करावी,अशी मागणी अल्पसंख्यांक विकास व हक्क फाउंडेशनने केली.
सविस्तर वृत्त असे की,राज्यात पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीची कार्यवाही चालू आहे. शिक्षक भरती फेज-१ (उमा १) ची कार्यवाही पूर्ण झाली असून पहिल्या टप्यात अमळनेर नगरपरिषदे कडून सर्व रिक्त पदे व विषयानुसार साधारणपणे इ. १ ली ते १२ वी पर्यंतची सर्व रिक्त पदे जाहिरातीसाठी दिली गेली नअसल्यान निवेदनाद्वारे उर्दू माध्यमाच्या शिक्षकाची रिक्त असणारी जास्तीत जास्त पदे पुढील काळात होणाऱ्या शिक्षक भरती टामा-२ मध्ये पवित्र पोर्टल मार्फत भरतीसाठी द्यावीत,रिक्त,अपात्र,गैरहजर जागांबाबत पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहीर झालेली पहिली यादी दिनांक २५ फेब्रुवारी, २०२४ व दुसरी यादी दिनांक २५ जून, २०२४ व ३०/०७/२०२४ या तीन्ही याद्या मधून निवडीसाठी शिफारस झालेले अनेक उमेदवार कागदपत्र पडताळणीतून बाहेर पडले आहेत. तसेच शेकडोच्या संख्येने उमेदवार गैरहजर राहिलेले आहेत. काही उमेदवार निवड होऊन नियुकीपत्र घेऊन देखील प्रत्यक्ष शाळेवर गैरहजर राहिलेले आहेत अशा सर्व जागांची शहानिशा करून त्या जागांची निश्चिती करावी व पुढील जाहिरात प्रक्रियेत त्या जागांचा समावेश करण्यात यावा,पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रक्रिया शाश्वत असताना अनेक नगरपालिका/ नगरपरिषद आस्थापनांनी ८० टक्के पदभरतीसाठी जाहिरात काढताना काही प्रमाणात जागा मागे ठेवल्या होत्या किंबहुना पूर्ण क्षमतेने जाहिराती काही कारणास्तव दिल्या नव्हत्या अशा महानगरपालिका आस्थापनांनी आपल्याकडील उर्वरित रिक्त पदांच्या जाहिराती पुढील भरती प्रक्रियेसाठी देण्यात याव्यात, सेवानिवृत्ती, पदोन्नती व तत्सम कारणांनी रिक्त होणाऱ्या जागा आपल्या नगररिषदेत कार्यरत शिक्षका मधून अनेक शिक्षकांचा सेवा कार्यकाळ संपाल्या मुळे मागील काही काळामध्ये मोठ्या संख्येने शिक्षक सेवानिवृत झाले आहेत तसेच मुख्याध्यापक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, परिक्षण प्रमुख,प्रशासकीय अधिकारी व इतर पदावर शिक्षकांची पदोन्नती झाल्यामुळे आपल्या नगरपरिषद आस्थापनां मधील अनेक जागा रिकाम्या झाल्या आहेत .या रिकाम्या झालेल्या जागांची निश्चिती करुन पुढील भरती प्रक्रियेसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देताना या रिकाम्या जागांचा सुध्दा सामावेश करण्यात यावा,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार कोणत्याही शाळेवर शिक्षक पदे रिक्त न ठेवण्याची तरतूद आहे.विशेषतः आपल्या आस्थापान मधील ग्रामीण भागा लगतच्या शाळेवर शिक्षकांची मोठया प्रमाणावर कमतरता जाणवते. शिक्षण हा राष्ट्र विकासाचा पाया असं आपण मानतो. परंतु शिक्षकांना वंचित विद्यार्थी आणि ओसाड शाळा यामुळे विकास खुंटलेल्या अवस्थेत आहे की काय असे वाटते.आपण विध्यार्थी व राष्ट्र हिताचा विचार करून शिक्षक भरती जरूर कराल अशी मागनी अल्पसंख्यांक विकास व हक्क फाउंडेशन तालुकाध्यक्ष अजहर अली,सैय्यद साबीर अली,शेख हफिज ,विकार अहमद,शेख हिना,सना कौसर,वसीम शेख,मूज़िर हुसैन,मोहसीन खान यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.