अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे दानशूर श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या १४५ व्या जयंती निमित्त खानदेश शिक्षण मंडळाचे वरिष्ठ संचालक डॉ. अनिल शिंदे व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अरुण जैन यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. हा कार्यक्रम वनस्पतीशास्त्र विभागाचा वनस्पती उद्यानात संपन्न झाला. डॉ. अनिल शिंदे व प्राचार्य डॉ. अरुण जैन यांनी वनस्पती उद्यानात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला व झालेल्या प्रगतीवर समाधान व्यक्त केले.
११ डिसेंबर रोजी श्रीमंत प्रताप शेठजी यांची जयंती निमित्त महाविद्यालयात दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. वनस्पतीशास्त्र विभागाने या निमित्त वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. जयेश साळवे, संरक्षण व समारिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रविंद्र मराठे, श्री. संदीप बिऱ्हाडे, रेहान मुजावर, प्रा. एच. जी. पाटोळे, पी. डी. पाटील, जे. पी. पडूल, एच. पी. शिंदे, एम. जी. पाटोळे, बी. पाटील, एच. येस. चौधरी व इतर शिक्षक वृन्द उपस्थित होते.